Tuesday, April 3, 2012

A Sales Executives Story..





















Jaane wo kaise
Sales Mangaers the jinko
Acha annual increment milaaa!!

Hum ne to bus, Incentive Manga Tha
To Pending recovery ka, Email milaa…!!

Reduce kar diye har benefits, de kar recession ka naam..
Salary bhi abe dete hai, jaise hum lete bhagwan ka naam..
Ab extra scope ke naam pe, extra sales ka target milaa
Hum ne to bus, incentive manga tha, to Pending recovery ka, email milaa!!!

Janne wo kaise, Sales Mangers the jinko, accha annual increment mila..!!

Old employee bolke, dete humko, char char aadmi ka kaam..
Ye bhi karo aur wo bhi karo me, beeti jaye, office me har ek sham..
Fir bhi pending issues ki wajah se, management se memo milaaa..!!
Hum ne to bus, incentive manga tha
To Pending recovery ka, email milaa

Janne wo kaise, sales Manager the jinko, Accha annual increment mila..!!

Promotion ki aas me, baithe hai hum, ek hi, level pe..
Naye log aaye aur manager ban gaye, hamare hi, sar pe..
Office ki AC cabin ki jagah pe, field data collection ka kam milaa
Hum ne to bus, incentive manga tha
To Pending recovery ka, email milaa

Jaane wo kaise Sales Mangers the jinko , annual incentive milaaa….


Amit……. 

कारण मी कधीच रिस्क घेत नाही !!

कारण मी कधीच रिस्क घेत नाही!

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
सासरेबुवा फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
सासरेबुवा मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा...
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
सासरेबुवा मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून,
सासरेबुवाचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||

मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...
मी कणकेमधून बाटली काढतो,
काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
सासरेबुवाचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वयंपाकघरात जातो,
हळूच फळीवर बसतो, गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात सासरेबुवा कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...
मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६

-- तळीराम
Copied from Internet !