Tuesday, August 3, 2010


प्रत्येक ओळीत जीवन भरलेलं एक अमर गीत 

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम रावे

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

मंगेश पाडगांवकर, अरुण दाते, यशवंत देव