Monday, June 7, 2010



अशी कशी ग तू 
कधी हसतेस चमकणाऱ्या चांदणीसारखी .. 
अन कधी रुसतेस अमावास्येच्या चंद्रासारखी ..

अशी कशी ग तू ..
कधी येतेस जवळ जसा माझ्याशिवाय जग अधुरे ... 
अन कधी ढकलतेस लांब जसे माझ्याविना काहीच नाही अपुरे …

अशी कशी ग तू ..
कधी बोलतेस इतकी की बिचारी रात्रही  कंटाळून झोपते .. 
अन कधी धरतेस असा अबोला की ती तिरकी नजर काळीजात कट्यार मारते ...

अशी कशी ग तू ..
चंद्र आणि सूर्य आलटून पालटून चेहऱ्यावर सजवणारी ...

अमित ०६/०६/२०१० 

3 comments:

Deepika said...
This comment has been removed by the author.
Deepika said...
This comment has been removed by the author.
Deepika said...
This comment has been removed by the author.